आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मोदी, भाजप, संघाची खिल्ली उडविणारा व्हिडिओ झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवडणुकीचा ज्वर आता सगळीकडे दिसू लागला आहे. सर्वच पक्षांमध्ये सेलिब्रिटीपासून गल्ली-बोळातील कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नेत्यांवर शाब्दिक हल्ले आणि त्यांची कार्टून्स, चुटकूले, मोबाईल मॅसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपवर निशाणा साधणार एक व्हिडिओ युट्यूबवर सर्वाधिक पाहिला जात आहे. या व्हिडिओत मोदींच्या इतिहासाच्या 'पांडित्या'ची खिल्ली उडविली गेली आहे, तर त्यांच्या खुर्ची प्रेमावर खरमरीत टीका करण्यात आली आहे. तसेच भाजपचे मंदिर आणि प्रभू रामा प्रतिचे प्रेम बेगडी असल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये शेवटी नरेंद्र मोदी यांच्या सारखी दिसणारी एक व्यक्ती दोन सुरे एकमेकांवर घासत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

भाजप समर्थकांनी काही दिवसांपूर्वी हसिबा अमीन यांच्या काँग्रेसच्या 'प्रत्येक हातात शक्ती, प्रत्येक हातात प्रगती' या जाहिरातीची खिल्ली उडविणारा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.
काँग्रेस आणि भाजपशिवाय सोशल मीडियावर 'तिस-या' क्रमांकाच पक्ष आम आदमी पार्टी ठरत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर युट्यूबवर अनेक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी जाहीर सभेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील एक चुटकूला ऐकवला होता. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनाम्यावर चिमटा घेत ते म्हणाले होते, केजरीवाल तुम्ही एवढे का पळत आहात, 'भाग मिल्खा भाग पार्ट-2' बनवायचा आहे का?
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भाजप-संघावर निशाणा साधणार व्हिडिओ