आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Non Married Woman Become Father Of Her Child Supreme Court

पित्याचे नाव न सांगताही अविवाहितेला पालकत्व, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निवाडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विवाह न झालेली आईही मुलाची पालक बनू शकते, तिला मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची आवश्यकता नाही तसेच त्याच्या परवानगीचीही गरज नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. एका राजपत्रित महिला अधिका-याने पालकत्व कायद्यातील तरतुदींना आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती विक्रमजित सेन यांच्या नेतृत्वाखालील पीठाने दिल्लीतील कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला. मुलाच्या संरक्षणासाठी आईचे नावही पुरेसे आहे, मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कनिष्ठ न्यायालयाने वडिलांची समंती आवश्यक असल्याचे म्हटले होते.

केसनुसार निर्णय घ्या
पासपोर्टसाठी पित्याचे नाव सांगणे आवश्यक नसेल तर मग पालक बनण्यासाठी ते अनिवार्य का?, अशा प्रकरणांत प्रत्येक केसनुसार निर्णय व्हायला हवा, असा युक्तिवाद या महिलेने केला.