आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • North East News In Marathi, Divya Marathi, Xi Jinping

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईशान्येकडील नागरिकांना जिनपिंग दौ-यात दूर ठेवले?, अहमदाबाद पोलिसांनी वृत्त फेटाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली| अहमदाबाद- चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अहमदाबादमधील भेटीत आदरातिथ्य करणा-या हॉटेलमध्ये ईशान्येकडील कर्मचा-यांना दूर राहण्यास सांगण्यात आले होते. गृहमंत्रालयाने तपास संस्थेला याविषयीची शहानिशा करून मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, गुजरात पोलिस आणि हॉटेल व्यवस्थापनाने असे कोणतेही आदेश आपल्याला मिळाल्याचे नाकारले आहे. जिनपिंग यांच्या दौ-यादरम्यान माध्यमांकडून असे आरोप करण्यात आले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, तिबेट प्रश्नावर निदर्शने होण्याच्या भीतीने ईशान्येकडील लोकांना जिनपिंग यांच्यापासून दूर ठरण्याचा प्रयत्न केला होता. या कथित आदेशावर प्रचंड टीका होत आहे.

आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी गेल्या आठवड्यात म्हटले की, ‘असा आदेश देणे म्हणजे ईशान्येकडील नागरिकांचा अपमान आहे. आम्ही देशभक्त नाहीत का? आम्ही भारताचे नागरिक नाहीत का?’ दिल्लीतील अरुणाचल स्टुडंट्स युनियननेही या आदेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गृहमंत्रालयाने आयबीला हे आदेश कुणी दिले, याचाही तपास करण्याचे आदेश दिले आहेत.