आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर भारत भूकंपाने हादरला, लाहोरपासून दिल्‍लीपर्यंत जाणवले धक्‍के

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तर भारत शुक्रवारी सकाळी भूकंपाच्‍या धक्‍क्‍यांनी हादरला. आज सकाळी सुमारे 8 वाजता भूकंपाचे धक्‍के जाणवले. जम्‍मू आणि काश्मिर, दिल्‍ली, पंजाब, हिमाचल प्रदेश इत्‍यादी भागात धक्‍के जाणवले. भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्‍टर मोजण्‍यात आली. पाकिस्‍तानमध्‍ये लाहोर आणि लगतच्‍या भागात भूकंपाचे धक्‍के जाणवले. आतायर्पंत कोणत्‍याही हानीचे वृत्त नाही.

प्राप्‍त माहितीनुसार, सर्वप्रथम डोडा, भद्रवाह आणि किश्‍तवाड येथे भूकंपाचे धक्‍के जाणवले. त्‍यानंतर पंजाब, दिल्‍ली आणि हिमाचल प्रदेशमध्‍येही धक्‍के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू किश्‍तवाडपासून 13 किलोमीटर अंतरावर दक्षिण-पूर्व दिशेला आणि जमिनीच्‍या आत 28 किलोमीटरवर होता. धक्‍के जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. डोडामध्‍ये शाळांना सुटी देण्‍यात आली.