आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्‍ये भूकंपात 50 बळी, पाकिस्‍तानात 5 जणांचा मृत्‍यू; भारतातही तीव्र धक्‍के

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- उत्तर भारत तसेच इशान्‍य भारताचा बहुतांश भाग आज दिवसभरात भूकंपाने हादरला आहे. इराणमध्‍ये आलेल्‍या भूकंपामुळे हे धक्‍के जाणवले आहेत. इराणमध्‍ये भूकंपात 50 पेक्षा जास्‍त जणांचा तर पाकिस्‍तानात 5 जणांचा मृत्‍यू झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. (भूकंपानंतरची छायाचित्रे) तसेच सकाळी जाणवलेल्‍या भूकंपाच्‍या धक्‍क्‍यांमध्‍ये आसाममध्‍ये एका 8 वर्षीय मुलाचा मृत्‍यू झाला. आखाती देश तसेच दक्षिण आशियामध्‍येही भूकंपाचे धक्‍के जाणावले.

इशान्‍य भारताला सकाळी भूकंपाचे धक्‍के तर संपूर्ण उत्तर भारत दुपारी 4 च्‍या सुमारास तीव्र भूकंपाच्‍या धक्‍क्यांनी हादरला. काही ठिकाणी 20 सकेंदांपर्यंत धक्‍के जाणवले. त्‍यामुळे भीतीने लोक कार्यालय आणि घराबाहेर पडले होते. सौदी अरब आणि अबू धाबीमध्‍ये अनेक ठिकाणी लोकंना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात आले.

प्राप्‍त माहितीनुसार, दुपारी पाकिस्‍तान आणि इराणच्‍या सीमेवर मोठ्या भूकंपाचे धक्‍के जाणवले. भूकंपाची तीव्रता 7.5 रिश्‍टर एवढी होती. त्‍यामुळे संपूर्ण उत्तर भारत हादरला. दिल्‍ली, पंजाब, राजस्‍थान, हरियाणा, उत्तर प्रदेशच्‍या अनेक भागात भूकंपाचे धक्‍के जाणवले.

आज सकाळी आसाम, ओडीशाच्‍या काही भागातही भूकंपाचे धक्‍के जाणवले, त्‍यात आसाममध्‍ये बारपेटा जिल्‍ह्यात भूस्‍खलन झाल्‍यामुळे एका मुलाचा मृत्‍यू झाला. तीन मुले बेकी नदीत मासेमारी करण्‍यासाठी गेले होते. परंतु, भूकंपामुळे जमीन खचली आणि त्‍यात तिघेही पाण्‍यात पडले. जेहरुल नेस्‍सा हा बुडला. तर त्‍याचे दोन साथीदार मोईदूल इस्‍लाम आणि कमल खातून यांना वाचविण्‍यात यश आले.