आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Not Allowing Sexual Intercourse For A Long Time Is Ground For Divorce: Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैवाहिक जीवनात दीर्घकाळापर्यंत शारीरिक संबंधास नकार देणे हे मानसिक क्रौर्य - सुप्रीम कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दीर्घकाळापर्यंत आपल्या जोडीदाराला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची परवानगी न देणे हे एक मानसिक क्रौर्य आहे आणि हे घटस्फोटाचे सबळ कारण ठरू शकते, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये सांगितले आहे की, आपल्या वैवाहिक जोडीदाराला कोणतेही सबळ कारण नसताना शारीरिक संबंध ठेवू न देणे मानसिक कौर्य आहे. कोर्टाने मद्रास हायकोर्टच्या निर्णयाला कायम ठेवले आहे. यात एका व्यक्तीला पत्नीने दीर्घ काळापर्यंत शारीरिक संबंध ठेवू दिले नाही याच कारणावरून घटस्फोट घेण्यास मंजूरी दिली होती. तसेच आपणास आपत्य नको आहे, त्यामुळे मी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असे पत्नीने आपल्या जबाबात सांगितले होते.
सुप्रीम कोर्टाने हा जबाब फेटाळला आहे. कोर्टाने लंडनमध्ये राहणार्‍या या व्यक्तीला आपल्या पत्नीस 40 लाख रुपयांचे भरपाई देण्यास सांगितले. मद्रास हायकोर्टाने या दाम्पत्याला सांगितले होते की, तुम्ही दोघे सुशिक्षित आहात आणि असे अनेक गर्भनिरोधक पर्याय आहेत, ज्याच्या वापराने तुम्हाला नको असलेल्या गर्भधारणेपासून वाचता येईल.
ट्रायल कोर्टाने फेटाळली होती याचिका
या जोडप्याचे लग्न 2005 मध्ये झाले होते. ट्रायल कोर्टाने पतीच्या घटस्फोटाची याचिका फेटाळली होती. तसेच हिंदू विवाह अधिनियमच्या कलम 9 अंतर्गत या जोडप्याला एकत्र राहण्यास सांगितले. मात्र हायकोर्चाने ट्रायल कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात निर्णय दिला.

नोट - वरील फोटो केवळ सादरीकरणासाठी घेण्यात आला आहे.