आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Fruitfull Ordinance To Save Criminal People Representative Rahul

कलंकित लोकप्रतिनिधींना वाचवणारा अध्यादेश निरर्थक, तो फाडून फेकला पाहिजे - राहुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानीत शुक्रवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन कलंकित खासदारांच्या बचावासाठी आपल्याच सरकारने काढलेल्या अध्यादेशावर ताशेरे ओढले. पक्षप्रवक्ते अजय माकन यांच्यासोबत फक्त तीन मिनिटांच्या या नाट्यमय पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘कलंकित खासदार-आमदारांचा बचाव करण्यासाठी सरकारने काढलेला अध्यादेशच निरर्थक आहे. तो फाडून फेकून दिला पाहिजे.’ आजवर राहुल यांनी केलेले हे सर्वांत वादग्रस्त वक्तव्य तर ठरलेच, शिवाय राजकीय गोटातही खळबळ उडाली.


राहुल उठून जाताना पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला तेव्हा ते म्हणाले, ‘विरोधी पक्षनेत्यांशी देणे-घेणे नाही. अध्यादेशाचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे हे माझे मत आहे.’ या वक्तव्याने काँग्रेससह सर्वच बुचकळ्यात पडले. केंद्राने अध्यादेश मागे घेण्याचे संकेत दिले. अमेरिका दौ-यावर असलेले पंतप्रधान मनमोहनसिंग परतल्यावर यावर निर्णय होणार आहे.


हे नाटक तर नव्हे...
मंगळवार : कॅबिनेटने अध्यादेशाला मंजुरी दिली. मात्र केंद्रीय मंत्री रमेश व मोईलींनी विरोध दर्शवला.
बुधवार : भाजपसह अनेक पक्षांच्या विरोधानंतर दिग्विजय म्हणाले, सर्व पक्षांशी चर्चा करून सर्वसंमतीने निर्णय झाला असता तर बरे झाले असते.
गुरुवार : अशा निर्णयांमुळे जनतेचा लोकशाहीवरील विश्वास कमी होईल : केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा
विरोध वाढल्याने काँग्रेस बॅकफूटवर?
1. अध्यादेशाला विरोधी पक्ष आणि नंतर काँग्रेसमध्येही विरोध झाला. जनतेत प्रतिमा उंचवावी म्हणून राहुल गांधी यांच्याकडून असे वदवून तर घेतले नाही ना?
2. काँग्रेस दोषींना वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचा संदेश यातून जात असल्याचे पक्षात अनेकांना वाटते.