आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Inch Land Go To Dragon, Defence Minister Information

भारताची इंचभर भूमीही ड्रॅगनच्या घशात नाही, संरक्षणमंत्र्यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताची 640 वर्ग किमी जमीन चीनने बळकावली असल्याच्या वृत्ताचा संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी लोकसभेत स्पष्ट इन्कार केला. या भागात भारतीय जवानांना गस्त घालण्यास चिनी सैनिक मनाई करत असल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

शुक्रवारी भाजप तसेच समाजवादी पार्टीने दोन्ही सभागृहांत हा मुद्दा उपस्थित करत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केली. खासदार यशवंत सिन्हा यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले की, चीन पाय पसरत असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे. मुलायमसिंह यांनीही अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. विरोधी सदस्यांनी आक्रमक होत गोंधळ घातला. यानंतर अँटनी यांनी खुलासा केला.

तुरुंगातूनही लढता येणार : तुरुंगात राहूनही खासदार-आमदार आता निवडणूक लढवू शकतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल बदलण्यासाठी अवघ्या पंधरा मिनिटांत जनप्रतिनिधित्व कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. राज्यसभेत ते मंजूर झाले आहे.


दोन्ही सभागृहांत विरोधक आक्रमक
काय म्हणाले अँटनी?
चीनला भारतीय भूभाग देण्याचा प्रश्नच येत नाही. राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष श्याम सरन यांच्या अहवालातही याचा उल्लेख नाही. दोन्ही देशांतील सीमावाद जुनाच आहे. जे क्षेत्र भारताचे म्हणून मानले जाते त्या भागात भारतीय सैनिक गस्त घालतात. तशाच प्रकारे चिनी सैनिक त्यांच्या अखत्यारीतील क्षेत्रात गस्त घालत असतात, असे अँटनी यांनी नमूद केले.


प्रकरण काय?
राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष श्याम सरन यांनी 2 ते 9 ऑगस्टदरम्यान लडाख क्षेत्राचा दौरा केला. यावर 2 सप्टेंबरला अहवाल सादर केला. अहवाल पंतप्रधान तसेच संरक्षण मंत्रालयास पाठवण्यात आला. याचा हवाला देत काही वृत्तपत्रांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या की चीनने भारताची 640 वर्ग किमी जमीन बळकावली आहे. या भागात भारतीय सैनिकांना गस्त घालण्याचीही परवानगी नसल्याचे बातम्यांत म्हटले होते. हा दावा सरकारने फेटाळला आहे.


आपण स्वत:शीच खोटे बोलत आहोत
भारताचे संरक्षणविषयक धोरण पूर्णत: चुकीचे आहे. कोणी पहिल्यांदाच गालात मारले तर चूक मारणा-याचीच असते. आपण 1962 मध्ये हे भोगले आहे. चीन सतत ताबा रेषा बदलत आहे. भारतीय जमीन बळकावत चालला आहे. आपण चुकीचे तर्क लावून समजूत काढत स्वत:शीच खोटे बोलत आहोत.’
भरत वर्मा, संरक्षणविषयक तज्ज्ञ


चीनसोबत मुत्सद्देगिरी
हाच एक मार्ग

चीनशी आपण युद्ध करू शकत नाही. म्हणून मुत्सद्देगिरीलाच महत्त्व द्यावे. रशियाशी याबद्दल चर्चा करावी लागेल. ब्रिक्स देशांचा वापर करावा लागेल. अमेरिकेशी असलेली भारताची सलगी चीनला आवडत नाही. आपल्याकडे असलेला ब्रिटिश काळातील नकाशा व दलाई लामांना समर्थनही चीनला मान्य नाही.’
कमल मित्रा चिनॉय, चीनविषयक अभ्यासक