आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Just Daughters In Law, Domestic Violence Act Must Protect Mothers In Law Too

केवळ सुनांनाच नव्हे तर वयस्कर सासुलाही मिळेल कायद्याचे संरक्षण:मनेका गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कौटुंबीक हिंसाचार कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर केवळ सुनांनाच नव्हे तर त्यांच्या सासुलाही सुनेपासून संरक्षण मिळणार असल्याचे केंद्रिय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले आहे.
सध्या कायद्याद्वारे केवळ अशा महिलांना संरक्षण मिळालेले आहे ज्यांचा पती किंवा इतर नातेवाईकांकडून छळ होतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनेका गांधींनी अधिका-यांना असा मसुदा तयार करायला सांगितले आहे, ज्यामध्ये सुनांकडून सासुचा छळ होत असल्यास त्यांना कायद्याचे संरक्षण प्राप्त होऊ शकेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनेका गांधी यांच्या निदर्शनास अशी अनेक प्रकरणे आली आहेत ज्यात मुलगा आणि सून वयस्कर महिलांचा छळ करतात. आतापर्यंत देशाच्या कायद्यात केवळ सुनांना संरक्षण होते, पण भविष्यात ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी कायदा तयार करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
फाइल फोटो : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी
पुढे वाचा कायदेतज्ज्ञांना दुरुपयोग होण्याची शंका...