आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Not Necessarily, However Manmohan 235 SPG Commandos Are Guarding

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनमोहनसिंग यांच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे 235 कमांडो? 19 कोटींचा खर्च अपेक्षीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना सुरक्षा उपलब्ध करून देण्याचा हलचाली सुरु झाल्या आहेत. मनमोहन यांच्या सुरक्षेसाठी 235 एसपीजी कमांडो तैनात (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाकडे याबाबत प्रस्‍ताव पाठवण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळताच मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सुरक्षेसाठी सुमारे 19 कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एसपीजीच्या अतिरिक्त 235 कमांडोंची नियुक्ती करण्याबाबतचा सचिवांनी प्रस्ताव तयार केला असून तो अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. मनमोहन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते 3, मोतीलाल नेहरू मार्ग स्थित बंगल्यात स्थलांतरीत झाले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅबिनेट सचिवांनी पाठवलेला प्रस्ताव गृहमंत्रालयाने नामंजूर केल्यास अतिरिक्त जवानांना स्थलांतरित केले जाऊ शकते. सध्या मनमोहन यांना दिल्ली पोलिसांतर्फे सुरक्षा देण्यात आली आहे.

अशी असेल सुरक्षाव्यवस्था
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या बंगल्याला सुरक्षा देण्यासाठी चार शिफ्टमध्ये 165 कमांडो तैनात करण्‍यात येणार आहे. यासोबत बंगल्याच्या परिसरात चार गार्ड स्टेशन आणि मुख्यप्रवेश द्वारावर एक सेक्युरिटी चेक पोस्ट असेल. त्यात स्कॅनर बसवलेले असेल.

माजी पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत अर्थसंकल्पात प्रावधान करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. अद्याप याला मंजुरी म‍िळालेली नाही.
एसपीजीजवळ 3000 कमांडो आहेत. पोलिस तसेच विविध सुरक्षा दल, त्यात बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि आयटीबीपीने नियुक्त करण्यात आले आहे.
मनमोहन यांना सध्या एक वर्षांसाठी सुरक्षा देण्यात आली आहे. एक वर्षानंतर त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्‍यात येणार आहे. देशाच्या माजी पंतप्रधानांना दहशतवाद्यांकडून धोका असल्याने अर्थसंकल्पात माजी पंतप्रधानांना सुरक्षा प्रदान करण्‍याचे प्रावधान आहे.
दरम्यान, मे, 1991 मध्ये दिवंगत राजीव गांधी यांची हत्या करण्‍यात आली होती. त्यानंतर एसपीजी कायद्यात सुधारणा करण्‍यात आली होती. त्यानंतर माजी पंतप्रधानांसह त्यांच्या कुटूंबियांनाही सुरक्षा देण्यात येत आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, एसपीजी कमांडोबाबत...
(फाइल फोटोः दिल्‍लीतील 3, मोतीलाल नेहरू मार्ग स्थित डॉ. मनमोहनसिंग यांचा बंगला)