आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Need For Any Surgery Of Asaram, Said Aims Doctor

आसाराम बापूंवर ओपीडीत उपचार शक्य, शस्त्रक्रिया नको- एम्समधील डॉक्टरांचा अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -बलात्कारप्रकरणी अटकेत असलेल्या आसारामला कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नाही तसेच त्याचा आजार औषधांनी बरा होऊ शकतो, असे स्पष्टीकरण एम्समधील डॉक्टरांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर दिले आहे.

आसाराम ऑगस्ट २०१३ पासून बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. न्या. टी. एस. ठाकूर आणि आदर्श कुमार गोयल यांच्या पीठाने सुनावणी केली की, ‘एम्समधील सहा डॉक्टरांच्या मते, सध्या आसारामला कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नाही. ओपीडीद्वारे त्यांच्यावर उपचार होऊ शकतात.’ यानंतर आसारामचे वकील सलमान खुर्शीद यांनी वैद्यकीय अहवाल वाचण्यासाठी काही वेळ मागितला. न्यायाधीशांनी यापुढील सुनावणी २० जानेवारी रोजी होईल, असे जाहीर केले. तसेच आसारामसह दोन्ही पक्षांना वैद्यकीय अहवालाच्या प्रती देण्याचे आदेश दिले. आसारामच्या वैद्यकीय तपासण्यांसाठीचा खर्च राजस्थान पोलिसांनी केल्याचेही कोर्टाने सांगितले.
राजस्थान पोलिसांनी काही वैद्यकीय तपासण्यांसाठी आसारामला दिल्लीतील एम्स रुग्णालयात आणले होते. प्रकृती बरी नसल्याने जामीन मंजूर करावा, अशी मागणी आसारामने राजस्थान पोलिसांनी केली होती. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाच्या पीठाने आसारामला विशेष वागणूक देण्याची गरज नसून वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर करण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. तसेच आसारामला जोधपूर न्यायालयातून तपासण्यांसाठी दिल्लीत आणण्याचा निर्णयही राजस्थान सरकारवर सोडला होता.