आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Need To Issue Ordinance For Simple Things, President Message To PM Modi

साध्या गोष्टींसाठीही वटहुकूम आणणे बरे नाही, राष्ट्रपतींचा मोदी सरकारला कठोर संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठच महिन्यांच्या कार्यकाळात दहा वटहुकूम आणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर दस्तुरखुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. साध्यासुध्या गोष्टींसाठी वटहुकुमांच्या माध्यमातून कायदे करणे योग्य नाही. ताबडतोब वटहुकूम आणण्याची गरज पडू नये यासाठी सर्व सर्व पक्षांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रपतींनी सोमवारी व्यक्त केले.

वटहुकूम आणण्याची तरतूद असामान्य वा आपत्कालीन परिस्थितीसाठीच आहे, या घटनेच्या तत्वाचे स्मरणही मुखर्जी यांनी करून दिले. ते म्हणाले, राज्यसभेत बहुमत नसल्याने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावून कायदे करणे, ही एखाद्या पक्षाची कार्यशैलीही व्यावहारिक नाही. विरोधी पक्षांना विरोध करण्याचा, पितळ उघडे करण्याचा आणि पुरेसे संख्याबळ असेल तर प्रसंगी संभाव्य कायदे फेटाळण्याही अधिकार आहे.

केंद्रीय विद्यापीठे व संशोधन संस्थांच्या कर्मचारी व विद्यार्थीवृंदास संबोधित करताना विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपले मत मांडले. विशेष म्हणजे, भूसंपादन विधेयक आणण्याची इतकी घाई का झाली आहे, असा खर्डा सवाल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना नुकताच विचारला होता.

पुढे वाचा मोदी सरकारचे प्रमुख दहा वटहुकूम...