आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद प्रकरणात लक्ष घालणे आमचे काम नाही - सर्वोच्च न्यायालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम प्रकरणात लक्ष घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने बुधवारी यासंदर्भातील याचिका फेटाळली.
सपा नेते किशोर समरीत यांनी याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी दाऊद भारतात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार होता या दाव्याची एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र,याआधीच्या सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही.
निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील एसआयटीकडून चौकशी करण्याची मागणीही याचिकेत केली होती. समरीते यांनी यासंदर्भात निवृत्त पोलिस आयुक्त कुमार व राम जेठमलानी यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. दाऊदची भारतात परतण्याची इच्छा होती,असा दावा जेठमलानी यांनी केला हेाता. यावर सरन्यायाधीश एच.एल.दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आढावा घ्यावे असे हे प्रकरण नाही.