नवी दिल्ली - रेल्वेचे तत्काळ तिकीट घेऊन प्रवास करणा-यांना आता जास्त पैसे मोजावे लागतील. तत्काळ कोट्यातील ५० टक्के तिकिटे आता डायनामिक फेअर सिस्टिमद्वारे विकली जाणार आहेत.
तत्काळ कोट्यातील निम्मी तिकिटे बुक झाल्यावर उरलेली "मागणीनुसार किंमत' सूत्रानुसार विकली जातील. या तिकिटांना प्रीमियम तत्काळ असे संबोधले जाईल. ८० निवडक रेल्वेगाड्यांत प्रीिमयम तत्काळ पद्धत लागू झाली असून, ही तिकिटे ऑनलाइन बुकिंगद्वारेच मिळतील.