आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची डेंग्यू रुग्णांची आकडेवारी फसवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनेक सरकारी अभियाने राबवल्यानंतरही देशात डेंग्यूचे प्रमाण वाढतच चालले आहे. चिंतेची बाब म्हणजे याची रुग्णसंख्या कोठेही नोंदवली जात नाही.भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सरासरी सुमारे २० हजार लोक डेंग्यूच्या तावडीत सापडतात, परंतु अमेरिकेतील एका संशोधनानुसार ही आकडेवारी यापेक्षा ३०० पट जास्त म्हणजेच ६० लाख एवढी आहे.

अमेरिकन जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीनमध्ये प्रकाशित या अहवालात २००६ ते २०१२ दरम्यानची आकडेवारी लक्षात घेण्यात आली आहे. अमेरिका आणि भारतातील संशोधकांनी मिळून हा अहवाल तयार केला आहे.

आतापर्यंत एक अब्ज डॉलरचे नुकसान
संशोधक चमूतील डॉनल्ड शेफर्ड से डायचे वेले यांनी सांगितले की, २००६ ते २०१२ या काळात दरवर्षी सरासरी २० हजार ४७४ रुग्णांची नोंदणी झाली आहे. मात्र, याचे प्रमाण यापेक्षा ३०० पटीने अधिक आहे. यावर सरकारने सुमारे ५५ कोटी डॉलर खर्च केले असून यामुळे अर्थव्यवस्थेला १.११ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या संशोधनाशी संबंधित असलेले एन. के.अरोडा यांच्या मते, खासगी क्लिनिक आणि रुग्णालयांकडून डाटा प्राप्त होत नसल्याने याबाबत देशात कोणताही अहवाल तयार होऊ शकला नाही. बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयांतच उपचारासाठी जातात, अशी माहिती समोर आली आहे.