आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पसंख्याकांच्या विरोधात उगीच गरळ ओकू नका, मोदींचा संघाला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील अल्पसंख्याकांविरोधात ऊठसूट टिप्पणी करणाऱ्या संघ परिवाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सज्जड इशारा दिला. अल्पसंख्याकांच्या विरोधातील टिप्पणी गैरलागू आहेत. कोणत्याही समाजाला लक्ष्य करून केला जाणारा हिंसाचार अजिबात खपवून घेणार नाही, असे मोदींनी एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, आपल्या राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्याबाबत तडजोड मान्य केली जाणार नाही. एक वर्षात देशात अच्छे दिन आले आहेत, परंतु काही लोक आमच्या चांगल्या कामांवर पाणी फेरण्याचे काम करत आहेत.
बहुसंख्याकांचा आदर व्हावा : दरम्यान, भाजपशासित राज्यांत लागू झालेल्या गोवंश हत्याबंदीचे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी समर्थन केले असून बहुसंख्याक समाजाच्या भावनांचाही आदर झाला पाहिजे. तुम्ही फक्त अल्पसंख्याकांच्या भावनांचेच बोलता, बहुसंख्याक समाजाच्या भावनांही लक्षात घ्यायला नको का, असे हेपतुल्ला म्हणाल्या.