आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Note Ban Hit RBI Badly, Central Bank Had To Spend 13k Crore To Print New Currency

नव्या नोटा छापण्यासाठी RBI चा 13 हजार कोटींचा खर्च, 84% चलन अर्थव्यवस्थेत परत आले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोव्हेंबरमध्ये नोटबंदीनंतर नवी करन्सी प्रिंट करण्यासाठी आरबीआयचा 13 हजार कोटींपर्यंत खर्च झाला. याचा खुलासा एसबीआयच्या एका रिपोर्टमध्ये झाला आहे. आरबीआयने जर नोटबंदीच्या आधी असलेल्या एकूण चलनाच्या 90% छपाई केली तर हा खर्च 500 कोटी रुपयांनी आणखी वाढू शकतो. नोटबंदीच्या आधी असलेल्या एकूण चलनाच्या तुलनेत 84% चलन परत अर्थव्यवस्थेत आले आहे.
 
500 आणि 2000 रुपयांवर सर्वात जास्त खर्च...
- एसबीआयच्या रिपोर्टनुसार, नोटबंदीच्या वेळी 15.44 लाख कोटी रुपये किमतीचे चलन परत आले आहे. यापैकी आतापर्यंत 84% चलन परत अर्थव्यवस्थेत आले आहे.
- नव्या चलनाच्या छपाईवर आरबीआयने आतापर्यंत 12 ते 13 हजार कोटींचा खर्च केला आहे. आता आरबीआय 200 रुपयांची नोटही छापत आहे. यामुळे 500च्या  नोटेसोबत 200 रुपयांचीही नोट जर छापली तर हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
कोणत्या चलनावर किती खर्च
 
करन्सी
उत्पादन खर्च (कोटी रुपये)
 
 
10 840
20 1370
50  710
100  2740
500  3980
1000  200
2000  830
वाहतूक खर्च  800
नाण्यांवरील खर्च  1500
एकूण खर्च  = 13000 कोटी
 
किती आहे प्रिटिंग कॉस्ट?
- एसबीआयच्या रिपोर्टनुसार, 10 रुपयांच्या एका नाण्यावर 6 रुपयांचा खर्च आला आहे.
- प्रत्येक 500 रुपयांच्या नोटेवर 2.87 रुपयांपासून ते 3.09 रुपयांचा छपाईचा खर्च आला आहे.
तर 2000 रुपयांच्या प्रत्येक नोटेवर 3.54 ते 3.77 रुपयांचा खर्च आला आहे.  
बातम्या आणखी आहेत...