आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींविरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करा - ईडीचे अावाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आयपीएल स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपी ललित मोदी यांच्या विरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती इंटरपोलकडे केली आहे. ललित मोदी सध्या ब्रिटनमध्ये आहेत.

आयपीएलचे माजी आयुक्त असलेल्या ललित मोदींविरोधात मुंबईच्या विशेष न्यायालयाने नुकतेच अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर ईडीच्या मुंबई कार्यालयाने त्याआधारे "रेडकॉर्नर नोटीस'साठी पत्र लिहिले आहे. हे पत्र सीबीआयच्या इंटरपोल शाखेकडे पाठवण्यात आले आहे. त्याची सत्यता पडताळून ते इंटरपोलला पाठवण्यात येईल. ही नोटीस जारी झाल्यानंतर इंटरपोल जगातील कोणत्याही भागातअसली तरी त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी प्रयत्न करते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडी ललित मोदींच्या प्रत्यार्पणाची शक्यता तपासून बघत आहे.
त्यासाठी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत आग्रह धरला जाऊ शकतो.