आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Notice Issued To Woman For Alleging Former Judge

निवृत्त न्यायाधीशावर लैंगिक शोषणाचा आरोप करणा-या महिलेस नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींवर लैंगिक शोषणाचा आरोप करणा-या वकील महिलेस चौकशी समितीसमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.मंगळवारी या महिलेने एका निवृत्त न्यायमूर्तींवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करून चौकशी सुरू केली.
बुधवारी या महिलेस नोटीस बजावण्यात आली असून 18 नोव्हेंबरपर्यंत समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांनी ही समिती नियुक्त केली असून यात न्यायमूर्ती आर. एम. लोढा, एच. एल. दत्तू आणि रंजना प्रकाश देसाई यांचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी समितीची पहिली बैठक झाली.
सर्वोच्च न्यायालयाचे सचिव जनरल रवींद्र मैथानी यांनी सांगितले की, आठवडाभरात तक्रारदार महिलेस हजर राहावे लागेल.