आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता निवृत्तीच्या दिवशीच मिळेल पीएफ-पेन्शनची रक्कम, सर्व प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आता निवृत्तीच्या दिवशीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि निवृत्तिवेतनाची (पेन्शन) रक्कम मिळेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन देण्याचे निर्देश जारी केले आहेत.
 
 
राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली. सध्या देशभरात केंद्र सरकारचे ४८.८५ लाख कर्मचारी असून सुमारे ५५.५१ लाख पेन्शनधारक आहेत.