आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान भाड्यासाठी ईएमआयची सोय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वस्त दरात विमान प्रवास घडवणा-या कंपन्या इंडिगो व जेट एअरवेजने ऑनलाइन शॉपिंगच्या धर्तीवर ग्राहकांना ईएमआयवर विमान तिकिटे देण्यास सुरुवात केली आहे. क्रेडिट कार्डवर तिकीट खरेदी करून दोन महिन्यांत दोन हप्त्याने पैसे भरता येतील. आतापर्यंत मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक कंपन्या अशा प्रकारची सुविधा देत होत्या.


बँकांशी करार : इंधनाचे वाढते दर आणि वाढती स्पर्धा यामुळे ही योजना आणली आहे. यासाठी एचडीएफसी, सिटीबँक आणि आयसीआयसीआय या बँकांशी करार करण्यात आला आहे.
14 टक्के सेवाकर : क्रेडिट कार्डवरून ग्राहकांना पेमेंट करता येईल. त्यावर 14 टक्के सेवाकर लागेल. एक टक्का प्रोसेसिंग शुल्कदेखील द्यावे लागणार आहे. दोन्ही कंपन्यांचा देशांतर्गत बाजारपेठेत 51 टक्के वाटा आहे.