आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाज कारची औरंगाबादेतून निर्यात, आफ्रिका, आशिया, युरोपातील १६ देशांत जाणार कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- बजाज ऑटोने आपल्या चारचाकीची (क्वाड्रिसायकल) १६ देशांत निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. बजाजच्या वाळूज येथील प्रकल्पात तयार होणाऱ्या या चारचाकी सप्टेंबरअखेरपासून जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहेत. देशात न्यायालयीन लढाईत अडकलेल्या क्वाड्रिसायकल श्रेणीमुळे बजाजने निर्यातीचे पाऊल उचलले आहे. बजाजने निर्यात होणाऱ्या चारचाकीचे नवे नाव क्यूट असून तिची किमत २००० डॉलर (सुमारे १ लाख ३२ हजार रुपये) ठेवण्यात आली आहे.
ऑक्टोबरमध्ये निर्यात
बजाजच्या वाळूज येथील प्रकल्पातून सप्टेंबर अखेरीस क्यूट कार दक्षिण अमेरिका, अाफ्रिका, युरोप आणि आशियातील १६ विविध देशांत निर्यात करण्यात येणार आहे. वाळूज येथील बजाजच्या प्रकल्पात या कारची निर्मिती होते. दिवसाकाठी २०० कार उत्पादनाची वाळूज प्रकल्पाची क्षमता आहे.
नवे नाव : क्यूट
बजाजने २०१२ मध्ये सर्वप्रथम आरई- ६० द्वारे क्वाड्रिसायकल श्रेणी आणली. मात्र, त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यात अनेकांचे हितसंबंध गुंतले आहेत. - राकेश शर्मा,
अध्यक्ष (आंतरराष्ट्रीय व्यवहार) बजाज अाॅटो
आरई-६० झाली क्यूट
बजाजने निर्यातीसाठीच्या चारचाकीचे नाव क्यूट ठेवले आहे. पूर्वी हिचे नाव आरई-६० होते. क्यूटचे इंजिन वॉटर कूल्ड, डीसीएसआय, ४ व्हॉल्व्हयुक्त आहे. ताशी कमाल ७० किमी वेगाने धावणारी क्यूट ३६ किमीचे मायलेज देते असा बजाजचा दावा आहे. २०० सीसी रिअर माउंटेड पेट्रोल इंजिन असणारी ही चारचाकी मुख्यत्वे इंट्रा-सिटी वाहतुकीसाठी तीनचाकीला पर्याय ठरणारी आहे.