आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Child Litearature In Mumbai Kala Ghoda Festivel

मुंबईच्या काळा घोडा महोत्सवात आता बाल साहित्याची मेजवानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विविधांगी कलांचा सुरेख संगम साधणा-या मुंबईच्या प्रसिद्ध काळा घोडा महोत्सवात आता भारत आणि जगभरातील विविध लेखकांबरोबरच्या संवादाच्या माध्यमातून बच्चेकंपनीला बाल साहित्याची मेजवानी मिळते आहे.
नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या वर्षीच्या काळा घोडा महोत्सवात विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अनेक लेखक आणि व्याख्याते कार्यशाळा घेत आहेत. बाल साहित्याची वाढती गरज लक्षात घेऊन गेल्या वर्षीच्या महोत्सवात बाल साहित्याचे स्वतंत्र दालन उघडण्यात आले होते. या वर्षीच्या महोत्सवात ऑस्‍ट्रेलिया, फ्रान्स आणि सिंगापूरमधील लेखक आणि व्याख्याते शाळकरी मुलांशी संवाद साधत आहेत, असे काळा घोडा महोत्सवाच्या मुख्य संयोजक लुबैना बंदूकवाला यांनी सांगितले.
शाळकरी मुलांना हॅरी पॉटर, नॅन्सी ड्र्यू आणि हार्डी बॉइज माहीत आहे. ते पुस्तकाच्या दुकानात जातात आणि हॅरी पॉटर विकत घेतात. कारण त्यांना तेच माहीत असते. भारतीय लेखकाने मुलांसाठी लिहिलेले पुस्तक त्यांना अभावानेच माहीत असते. बाल साहित्य आणि भारतीय लेखकांमधील दरी सांधण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. कविता मदाना, शालिनी श्रीनिवासन, बालाजी व्यंकटरामन यांच्या बरोबरच ऑस्‍ट्रेलियन बालसाहित्यिक केन स्पिलमन हे दक्षिण मुंबईतील शाळांमध्ये लेखन आणि वाचन कार्यशाळा घेणार आहेत.
पाच शाळांमध्ये लेखक आपल्या भेटीला
काळा घोडा महोत्सवानिमित्त लेखक खास काळा घोडा कारमधून मुंबईतील पाच शाळांमध्ये जाऊन लेखन- वाचन कार्यशाळा घेणार आहेत. हा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. या वर्षीच्या महोत्सवात उर्दू कवितेवरील कार्यशाळा, भारतीय चित्रपट आणि स्वसंरक्षणावरील कार्यशाळेसह एकूण 350 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.