आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Congress Leaders Say One Time Food Is Available For 1 Rupee

नेत्यांकडून गरिबीची थट्टा सुरूच; जेवण तर म्हणे, एका रुपयातही मिळते!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नेत्यांकडून गरिबीची थट्टा सुरूच आहे. काँग्रेस नेते आधी मुंबईत 12, तर दिल्लीत पाच रुपयांत भरपेट जेवू घालत होते. आता केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी हा दर आणखी कमी केला. शुक्रवारी ते म्हणाले, ‘जेवण 1 रुपयात मिळते अन् शंभर रुपयातही. किती खर्च करायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.’

5 रुपयांत जेवण मिळते, असे गुरुवारी सांगणारे काँग्रेसचे रशीद मसूद यांनाही जोश आला. रुपयात जेवण मिळू शकते, असे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते राज बब्बर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. अब्दुल्ला यांनाही संध्याकाळी माफी मागण्याची उपरती झाली.नियोजन आयोगाच्या गरिबीसंबंधी आकडेवारीने हा वाद पेटला आहे.काँग्रेस प्रवक्ते राज बब्बर
म्हणाले : मुंबईत आजही 12 रुपयात जेवण मिळते
पक्ष : प्रवक्ते अजय माकन म्हणाले, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, पक्षाचे नव्हे.
घूमजाव : वक्तव्याचा विपर्यास केला. भावना दुखावल्याबद्दल माफी मागतो.


काँग्रेस खासदार रशीद मसूद
म्हणाले : दिल्लीत 5 रुपयांत जेवण मिळते, मुंबईची माहिती नाही.
पक्ष : यांच्या वक्तव्याचीही जबाबदारी पक्षाने नाकारली
आडमुठेपणा : वक्तव्यावर ठामच. आता म्हणाले - एका रुपयातही जेवण मिळते.