आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू दहशतवादावर आता खडाजंगी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ‘हिंदू दहशतवादाचा’ उल्लेख केल्यामुळे राजकीय वादंगाला तोंड फुटले आहे. केंद्र सरकार दहशतवादाचे उच्चाटन करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळेच बहाणे केले जात आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. वास्तविक भाजप देखील या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी संसदेत गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्यावर संसदेत लेखी निवेदन दिले. त्यात यूपीए सरकारने ‘हिंदू दहशतवाद’ शब्द पेरून दहशतवादाच्या विरोधातील संघर्षाला कमकुवत केले आहे. त्यावर मी हा शब्द उच्चारलाच होता. परंतु संसदेत नव्हे. जयपूरच्या काँग्रेस संमेलनात, असे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगून सावध पवित्रा घेतला. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले, राजनाथ यांनी चुकीच्या पद्धतीने हिंदू दहशतवादाचा उल्लेख केला आहे. गुलामनबी आझाद म्हणाले, भाजप फुटीरतावादाचे राजकारण करत आहे. दहशतवादाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. त्याला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर दिले.
इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या बलिदानातून काँग्रेसने काहीही धडा घेतलेला नाही. त्यामुळेच काँग्रेसचा दहशतवादासंबंधीचा दृष्टिकोन अशा प्रकारचा दिसतो. २०१० मध्ये राहुल गांधी अमेरिकी राजदूताशी हिंदू दहशतवादाबद्दल बोलले होते. त्यावेळी राहुल यांच्या मताविषयी शिंदे गप्प का होते, असा सवाल रविशंकर यांनी केला. दरम्यान, लिबियात अपहृत दोन भारतीयांच्या सुटकेचे श्रेय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज घेत आहेत. मग भारत लिबियात आयएससोबत बिझनेस करत आहे का, असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ट्विट करून केला आहे.
बातम्या आणखी आहेत...