आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता फेसबुकवर कमावा पैसे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -सोशल नेटवर्कींग साइट 'फेसबुक' युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. 'फेसबुक'च्या माध्यमातून आता चांगली कमाईही करता येणार आहे. आपल्या प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटीसाठी एक डॉलर मिळणार आहे. मात्र अशा प्रकारचे युजर्स जगभरात बोटावर मोजण्‍या इतके आहेत. सध्‍या न्यूझीलंडमध्‍ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. 'फेसबुक'तर्फे नेहमीच अशा प्रकारचे विविध प्रयोग केले जात असल्याचे एका अ‍ॅडव्हॉन्सड्‍ युजर्स अ‍ॅल फ्लेड यांनी सांगितले.

युजर्सला किती रुपये मिळू शकतात
युजर्स फेसबुकचा किती वापर करतो व अ‍ॅथोरिटीव्ह इंडेक्सवर त्याची अ‍ॅक्टिव्हिटी कुठे आहे, या दोन गोष्‍टींवरून
फेसबुक संबंधितांना रुपये प्रदान करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 2013 युजर्संना ही सुविधा मिळणार आहे. यामध्‍ये एका अ‍ॅक्टिव्हिटीसाठी एक डॉलर दिला जाणार आहे. जशी संख्‍या वाढेल त्याप्रमाणात डॉलर दिले जाणार आहे.

अ‍ॅडव्हान्स्‍ड युजर्स कोण ?
अ‍ॅडव्हान्स्‍ड युजर्सला फेसबुकचे नोटिफ‍िकेशन दिली जाईल.त्यात आपण अ‍ॅडव्हान्स्‍ड युजर्ससाठी निवडले गेले आहात असा संदेश असेल. आपल्याला पाठवण्‍यात आलेल्या लिंकवर क्रेडीट कार्ड व बँक तपशील द्यावे लागेल.