आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीठ, साखर व फॅटचे प्रमाण निश्चित होणार; आता जंंकफूडवर बडगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मॅगीच्या वादानंतर आता सरकारने डबाबंद खाद्यपदार्थ म्हणजेच जंकफूडमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित केले आहे. डबाबंद खाद्य पदार्थांतील मीठ, साखर आणि फॅटचे जास्त प्रमाण आरोग्यावर विपरीत परिणाम करते, असे एफएसएसएआय या भारतीय खाद्य नियामकाचे म्हणणे आहे. त्याची तपासणी करण्यासाठी एफएसएसएआयने ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती डबाबंद खाद्यपदार्थांतील मीठ, साखर आणि फॅटचे प्रमाण आणि त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत शिफारशी करणार आहे. फास्टफूडच नव्हे तर बाजारात विक्री होणाऱ्या खाण्या-पिण्याच्या प्रत्येक पदार्थांतील मीठ, साखर व फॅटचे प्रमाणही निश्चित होणार आहे.

वस्तुस्थिती :
>भारतात मधुमेहाचे सुमारे ६.३ कोटी रुग्ण. म्हणजे प्रत्येक १५ वा भारतीय मधुमेही.
>भारतात १५ वर्षांपेक्षा ७०,००० मुलांना मधुमेह.
>भारतात दरवर्षी १ लाख ३० हजार मुले हदयाच्या आजारासह जन्माला येतात.
>स्थुलपणात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
बातम्या आणखी आहेत...