आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now First Passport After That Police Verification

पासपोर्ट बनल्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- लवकरात लवकर पासपोर्ट तयार व्हावा म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने पोलिस पडताळणीच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता पासपोर्ट जारी झाल्यानंतरच त्याचे पाेलिस व्हेरिफिकेशन केले जाईल. यासाठी अर्जदाराला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो मतदार ओळखपत्राच्या प्रतींसोबत आपल्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही, असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. ओळखपत्रांचे डाटाबेसमधून ऑनलाइन व्हेरिफिकेशन हाेईल. या नव्या व्यवस्थेत अतिरिक्त खर्च येणार नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सरकारने सांगितले होते की, पासपोर्ट पुन्हा जारी करताना पोलिस व्हेरिफिकेशनची गरज नसेल. व्हेरिफिकेशन रिपोर्ट लवकर जमा व्हावा यासाठी एम-पासपोर्ट पोलिस हे अॅपही जारी केले आहे. यामुळे वैयक्तिक माहिती डाऊनलोड करून प्रिंट काढण्याची गरज नसेल. पासपोर्ट तयार करण्याचा अवधी २१ दिवसांपेक्षा कमी व्हावा, असा सरकारचा उद्देश आहे.