आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Government Gents Employee Get Maternity Leave Also

पुरुष कर्मचाऱ्यालाही मूल संगोपनासाठी रजा, सातव्या वेतन आयोगाच्या अहवालामध्ये शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यासही (सिंगल मेल पॅरेंट) मुलाच्या संगोपनासाठी रजेची शिफारस सातव्या वेतन आयोगाने केली आहे. आतापर्यंत केवळ महिला कर्मचाऱ्यांनाच अशी रजा मिळायची. पुरुष कर्मचारी एकल असेल तर मुलांच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडते म्हणून अशा कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकाळात दोन वर्षांची संगोपन रजा देण्यात यावी, असे वेतन आयोगाने म्हटले आहे.
या अहवालानुसार, अशा पुरुष कर्मचाऱ्याला त्याच्या मुलाच्या (१८ वर्षांपर्यंतच्या) संगोपनासाठी ७३० दिवसांची रजा मिळणार आहे. यातील पहिल्या ३६५ दिवसांची रजा १०० टक्के पगारी तर उर्वरित ३६५ दिवसांची रजा ८० टक्के पगारी राहील. अशा पुरुष कर्मचाऱ्याला एका कॅलेंडर वर्षात सहा टप्प्यांत ही रजा मिळेल.