आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोलफ्री नंबरवर सुरू किंवा बंद करा मोबाइल इंटरनेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोबाइलधारकांना १९२५ या नवीन टोलफ्री नंबरचा वापर करून इंटरनेटसेवा सुरू किंवा बंद करता येईल. या नंबरवर फोन करून किंवा मेसेज पाठवून नेटसेवा अॅक्टिव्हेट व डीअॅक्टिव्हेट करता येईल. जास्तीच्या कमाईसाठी मोबाइल कंपन्या सेवा बंद करण्यासाठी क्लिष्ट प्रक्रियांचा अवलंब करत असल्याच्या असंख्य तक्रारी दूरसंचार नियामक ट्रायकडे आल्या होत्या. त्यामुळे सर्व मोबाइल कंपन्यांसाठी हा क्रमांक सक्तीचा करण्यात आला. अमलासाठी कंपन्यांना १ सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे. मोबाइलवर नेट सुरू करायचे तर ‘स्टार्ट’, बंद करण्यासाठी ‘स्टॉप’ असा मेसेज १९२५ वर पाठवावा लागेल. त्यानंतर कंपन्यांना तत्काळ उत्तर देऊन स्टेटस सांगावे लागेल.

डाटाचीही माहिती : डाटा पॅक ग्राहकांना मर्यादेच्या ५०, ९० व १००% डाटा वापरानंतर अलर्ट द्यावा लागेल. ५०० एमबी, १०० एमबी व १० एमबी शिलकीचा अलर्ट द्यावा लागेल.
बातम्या आणखी आहेत...