आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Mobile Call Drop While Speaking Balance Refund

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोलता बोलता अचानक फोन कट झाल्यास आता बॅलन्समध्ये पैसे जमा होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोबाइलवर बोलता बोलता अचानक फोन कट झाल्यास आता तुम्हाला पैसे मिळतील. आॅगस्टपासून त्याची सुरुवात होईल. मोबाइल कंपन्या बॅलन्सच्या रूपात हा पैसा देतील.तीन महिन्यांपासून सुरू असलेली या प्रोजेक्टची ट्रायल पूर्ण झाली आहे.
प्रत्येक मोबाइल सर्कलवर देखरेख करण्यासाठी दूरसंचार विभागात उपकरणे बसवली आहेत. यामुळे कोणत्या कंपनीच्या, कोणत्या सर्कलमधील, किती लोकांचे, किती मिनिटांचे काॅल ड्राॅप झाले याची माहिती मिळेल. दूरसंचार अधिकाऱ्यांनी सांगितले की, काॅल ड्राॅप झाल्यापासून तीन तासांत मोबाइल कंपनीला ग्राहकाने ट्रायकडे नोंदवलेल्या खात्यात पैसे भरावे लागतील. आठवडाभरात जमा होणारा पैसा बॅलन्सच्या रूपात ग्राहकाला परत केला जाईल.

मोबाइल युजर्सच्या वाढत्या संख्येमुळे काॅल ड्राॅपची समस्याही मोठी आहे. काही सेकंद किंवा मिनिटभरासाठी फोन कट झाल्यास ग्राहकाचे भलेही फारसे नुकसान होत नसेल, परंतु मोबाइल कंपन्यांना त्यातून कोट्यवधी रुपयांचा फायदा होतो. ट्रायच्या निकषानुसार काॅल ड्राॅपचा रेट दोन टक्क्यांपेक्षा जास्त असायला नको. परंतु सरासरी प्रत्येक ४ ते ५ काॅलनंतर एक काॅल ड्राॅप होतो. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, ते ३ ते १४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

कंपन्यांची कमाई कशी होते
देशात दरमहा एक ग्राहक सरासरी ३५० मिनिट काॅल करतो. म्हणजे वर्षाला ४२०० मिनिट काॅल होतो. रिपोर्टनुसार प्रत्येक चाैथा किंवा पाचवा काॅल काही सेकंदाच्या संभाषणानंतर कट होतो. परंतु कंपन्या मात्र पूर्ण शुल्क आकारतात. यातून त्यांना दरवर्षी कोट्यवधींचा फायदा होतो.

ग्राहकांचा फायदा असा
यामुळे दर आठवड्याला १० ते १५ रुपयांचा बॅलेन्स मिळायला लागेल. कंपन्यांना सर्वाधिक नुकसान होईल. यामुळे सेवा सुधारली जाईल. वारंवार काॅल कट होण्याची समस्याही मिटेल.