आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Our Country Use Solapur Model For The Watch On Sand Robbery

सोलापूर मॉडेलने वाळू माफियांवर वॉच, १ जानेवारीपासून देशभर मॉडेल लागू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी साेलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी तयार केलेले मॉडेल १ जानेवारीपासून संपूर्ण देशात लागू केले जाणार आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशभरात वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणांवर सॅटेलाइटद्वारे नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेडाम सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना बारकोडचा अवलंब करून वाळू चाेरीवर अाळा घातला होता. त्यांचे हे मॉडेल देशभर लागू करण्यासाठीचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या नवीन कायद्यामुळे ज्या ठिकाणी वाळू उपसा करण्यात येतो, अशा परिसरात कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जवळपास पाच हेक्टर परिसरातील हालचाली ठळकपणे कॅमेराबंद होतील. या कायद्यामुळे राज्य सरकारच्या महसुलात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.
बारकोडची पावती
जावडेकर यांनी सांगितले की, वाळू उपशात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. वाळू, दगड, गिट्टी, मार्बल आदींचे उत्खनन करताना तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक ट्रकला एका फेरीस एक बारकोडची पावती दिली जाईल. हा ट्रक गेल्यानंतर त्याला पुन्हा त्या पावतीचा वापर करता येणार नाही. आधी एका पावतीवर दिवसभर वाळूची चोरी व्हायची. काही ठिकाणी शासकीय यंत्रणाही यात गुंतल्याचे निदर्शनाला आले होते. नदीपात्रात नेमक्या कोणत्या ठिकाणी वाळूचा उपसा करायचा आहे, याबाबतची माहिती या पावतीमध्ये देण्यात येणार आहे. तत्पूर्वी नदीत कोणत्या ठिकाणी वाळू अधिक आहे आणि त्याचे उत्खनन करण्यास हरकत नाही याची माहिती अद्ययावत तंत्रज्ञानातून प्रशासनाला मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी एक समिती असणार आहे. त्याद्वारे मूल्यमापन केले जाईल. उत्खनन करण्यासाठी ५ हेक्टरपर्यंत जिल्हाधिकारी परवानगी देऊ शकतात. ५० हेक्टरपर्यंत राज्य सरकार अनुमती देईल.