आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पासपोर्टवर संपूर्ण माहिती मिळणार चित्राच्या स्वरूपात, फेरफेरीला बसणार आळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पासपोर्टवरील फोटोमध्ये आता खाडाखोड करता येणार नाही. फोटोसोबतच आता त्याची छायाप्रत देण्याची व्यवस्था परराष्‍ट्र मंत्रालयाने केली आहे. हा फोटो नसेल परंतु पासपोर्टधारकासंबंधी माहितीच्या अक्षरांनी तयार झालेले छायाचित्र असेल. सर्व नव्या पासपोर्टमध्ये हे तंत्र वापरण्यात येत आहे.


परराष्‍ट्र मंत्रालयाचे संयुक्त
सचिव आणि मुख्य पासपोर्ट अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी सांगितले की, या तंत्राद्वारे कोणत्याही पासपोर्टवरील फोटो बदलता येणार नाही. नव्या पासपोर्टसाठी अर्ज करणा-याची बायोमेट्रिक खूण घेताना दुसरा कोणीही व्यक्ती नसेल. यामुळे फोटो व बायोमेट्रिक खूण वेगवेगळ्या व्यक्तीची असण्याची शंका दूर होऊ शकेल.


माहितीसाठी हेल्पलाइन : अर्जदारांना 24 तासांच्या आत माहिती देण्यासाठी हेल्पलाइन नंबर 18002581800 सुरू करण्यात आला आहे. 24 जून रोजी पासपोर्ट दिन आहे. यानिमित्त 25 ते 30 हजार पासपोर्ट जारी करण्यात येत आहेत.