आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेल्वे तिकिटाचीही कॅश ऑन डिलेव्हरी, बुकींग करा आणि तिकिट मिळवा घरपोच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आता रेल्वेचे ऑनलाईन तिकिटही ‘कॅश ऑन डिलेव्हरी’ या सुविधेवर उपलब्ध होऊ शकणार आहे. म्हणजेच आयआरसीटीसीच्या बेवसाईटवर तिकिट बूक केल्यास ते तिकिट ग्राहकाला घरपोच मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे तिकिट मिळाल्यानंतर पैसे देण्याची सुविधा उपलब्ध असेल. देशातील 100 मोठ्या शहरांमध्ये 20 ऑक्टोबरपासून रेल्वे विभाग ही सेवा सुरू करणार आहे.
या सेवेमुळे ग्राहकांना तिकिटाचे पैसे देण्यासाठी क्रेडीट किंवा डेबिट कार्डचा वापर करण्याची गरज असणार नाही. अनेकदा या माध्यमातून पैसे भरताना तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना समस्यांना तोड द्यावे लागत होते. पण आता त्या त्रासापासून सुटका होणार आहे.

मोफत घरपोच सेवा
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार ई तिकिटावर बुकींगच्या वेळी पैसे भरण्याचा पर्याय आल्यावर त्याठिकाणी कॅश ऑन डिलेव्हरीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तिकिट बूक करताना प्रवाशाने फॉर्मवर भरलेल्या पत्त्यावर 12 तासांच्या आत तिकिट पोहोचेल. त्यावेळी ग्राहकांना केवळ तिकिटाचे पैसे मोजावे लागतील, घरपोच सेवा मोफत असणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी रेल्वेच्या वेबसाईटमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आल्याचेही रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले.