आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेल्वेचे तिकीट मोबाईलद्वारे बुक करा अवघ्या काही मिनिटांत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आता तुम्हाला रेल्वे तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही तसेच इंटरनेट कॅफेत जावून ऑनलाईन तिकीट बुकिंक करावे लागणार नाही. कारण येत्या 1 जुलैपासून तुम्ही रेल्वेचे तिकीट तुमच्या मोबाईलद्वारे एका एसएमएसमध्ये आरक्षित करू शकता. भारतात नागरिकांपेक्षा मोबाईलची वाढती संख्या व जवळजवळ प्रत्येक नागरिकांकडे मोबाईल असल्याने आयआरसीटीसी एसएमएसद्वारे तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची रेल्वे मंत्रालय लवकरच घोषणा करणार आहे. या एसएसमएस सेवेचा क्रमांक लवकरच जारी होणार आहे. या बुकिंगवर एका एसएमएससाठी 3 रुपये शुल्क आकारले जाईल. पेमेंट शुल्क म्हणून पाच हजारांपर्यंतच्या तिकिटावर पाच रुपये, तर त्यापेक्षा अधिक रकमेसाठी 10 रुपये शुल्क आकारले जाईल.

रेल्वेच्या नव्या सोयी-सुविधेमुळे कोणत्याही नागरिकाला कोठूनही मोबाईलद्वारे तिकीट बुक करता येईल. प्रवाशाला आपल्या मोबाइलवरून रेल्वे क्रमांक, प्रवासाचे ठिकाण, तारीख, श्रेणी, स्वत:चे नाव, वयाची माहिती असलेला एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर त्याला एमएमआयडीकडून एक पासवर्ड मिळेल. या माध्यमातून तिकिटाचे शुल्क अदा केले जाईल. ते जमा झाल्यानंतर तिकीट बुक होईल. तसेच यासाठी तिकीटाचा पुरावा म्हणून प्रिंट कॉपी ठेवण्याची गरज नाही. कारण तुमच्या मोबाईलमध्ये आयआरसीटीसीने तुम्हाला पाठवलेल्या एसएमएसमधेये तुम्ही बुक केलेल्या गाडीचा नंबर व नाव, फलाट क्रमांक, स्थळ, वेळ व तारीख याची सर्व माहिती असेल. हा एसएमएसच तुमचे तिकीट समजण्यात येणार आहे.

मात्र, या सुविधेसाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा क्रमांक आयआरसीटीसी आणि तुमच्या बॅंकेकडे नोंदवावा लागेल. त्यानंतर बॅंकेकडून तुम्हाला एमएमआयडी (मोबाईल मनी आयडेंटीफायर) आणि ओटीपी (वन टाईम पासवर्ड) दिला जाईल. ही पद्धत खूपच सोपी, वेळ वाचवणारी व सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार असल्याने लागलीच लोकप्रिय होईल, असे रेल्वेच्या अधिका-यांना वाटते.