आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामींच्या निशाण्यावर आता चीफ इकॉनॉमिक अॅडव्हायजर, US ला मदत केल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे वाचाळ खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. स्वामींनी बुधवारी सकाळी ट्विट करुन अरविंद यांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला आहे, की अरविंद भारत विरोधी आहेत. 2013 मध्ये त्यांनी यूएस काँग्रेसला भारतविरोधीत कारवाई करण्यास सांगितले होते.

आणखी काय म्हणाले स्वामी
- स्वामींनी बुधवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, '13-03-2013 रोजी अरविंद यांनी यूएस काँग्रेसला म्हटले होते की अमेरिकेच्या फार्मासिटिकल कंपनीसाठी भारताविरोधात कारवाई केली पाहिजे. अरविंद सुब्रमण्यम यांना हटवले पाहिजे.'
- दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले, 'मोदींचे चीफ इकॉनॉमिक अॅडव्हायजर अरविंद यांनी आतापर्यंत आयपीआर (इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी) वरुन भारताच्या विरोधी भूमिका घेतली होती.'
- मोदी सरकारने ऑक्टोबर 2014 मध्ये अरविंद यांची चीफ इकॉनॉमिक अॅडव्हायजर पदी नियुक्ती केली होती.

राजन यांना हटवण्याचे क्रेडिट
- भाजप खासदार स्वामींनी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरुन हटवण्याचे क्रेडिट स्वतःला दिले आहे.
- स्वामींनी राजन यांच्यावर आरोप केला होता की त्यांनी भारतीय अर्थव्यस्थेला खिळ घालण्याचे काम केले आहे.
- स्वामींनी राजन यांच्यावर वारंवार टीका केली, त्यांना परत शिकागोला पाठवले पाहिजे असेही कॉमेंट त्यांनी केली होती.
- या पार्श्वभूमीवर राजन यांनी गव्हर्नरपदाची दुसरी टर्म पूर्ण करणार नसल्याची घोषणा नुकतीच केली आहे.
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...