Home | National | Delhi | Now the battle starts for two ideals : Meera Kumar

माझी उमेदवारी प्रतीकात्मक, आता दोन विचारसरणीमधील लढाईला सुरुवात : मीरा कुमार

वृत्तसंस्था | Update - Jun 29, 2017, 03:00 AM IST

माझी उमेदवारी प्रतीकात्मक असून आता दोन विचारसरणीमधील लढाईला सुरुवात झाली आहे, असे राष्ट्रपतिपदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी म्हटले आहे.

  • Now the battle starts for two ideals : Meera Kumar
    नवी दिल्ली- माझी उमेदवारी प्रतीकात्मक असून आता दोन विचारसरणीमधील लढाईला सुरुवात झाली आहे, असे राष्ट्रपतिपदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांनी म्हटले आहे. ७२ वर्षीय मीरा कुमार यांनी बुधवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची उपस्थिती होती.

    माझ्यासाठी आजपासून वैचारिक पातळीवरील लढाईला सुरुवात झाली आहे. ही लढाई लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. माध्यमांचे स्वातंत्र, गरीब हटाव, पारदर्शकता, जातिअंतासाठी हा संघर्ष आहे. परंतु दुर्देवाने समाजात संकुचित दृष्टिकोन आहे. ही चिंता आहे. प्रत्येकाने अंतरात्म्याचा आवाज ऐकावा, असे मीरा कुमार यांनी म्हटले आहे. अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी देखील होते. याप्रसंगी सोनिया गांधी म्हणाल्या, आमच्यासाठी ही वैचारिक तत्त्वज्ञानाची, सत्याची लढाई आहे.

    मीरा कुमार आपल्या प्रचाराची सुरूवात ३० जून पासून गुजरातमधील साबरमती आश्रमातून करणार आहेत.

Trending