आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिसरात प्रदूषण कमी असेल तर ‘ट्री-हाऊस’ देईल माेफत वाय-फाय नेटवर्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जलमार्ग, किनाऱ्यावर लावलेली झाडे, सायकलचा फेरफटका आणि स्वच्छ हवा अशी नेदरलँड्सची राजधानी असलेल्या अॅमस्टरडॅम शहराची ओळख आहे. मात्र, सध्या या शहराला देखील प्रदूषणासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी जोरिस लॅम नावाच्या व्यक्तीने नवीन पद्धत शोधली आहे. त्याने ठिकठिकाणी मोफत वाय-फाय देणारे ट्री हाऊस लावले आहेत. हे ट्री-हाऊस झाडांवर लटकलेल्या पक्षांच्या घरट्याप्रमाणे आहे. परिसरातील प्रदूषणाची पातळी निश्चित केलेल्या मर्यादेत असेल तरच याचे वाय-फाय सुरू होते.

जे नागरिक प्रदूषणाची पर्वा करत नाहीत, अशाच नागरिकांसाठी आपण हे डिव्हाइस बनवले असल्याचे लॅम यांनी सांगितले. प्रदूषणाची पातळी मोजता यावी आणि ज्यामुळे लोकांना प्रदूषण किती आहे हे समजू शकेल असे डिव्हाइस बनवण्याची माझी इच्छा होती. माझ्याकडे जो डाटा उपलब्ध होता, त्यानुसार पूर्ण शहरात प्रदूषणाची पातळी लक्षात येत असली, तरी या आकडेवारीचे मी काय करणार असा विचार माझ्या मनात अाला. एखाद्या गल्लीत किंवा कॉलनीत किती प्रदूषण आहे हे यावरून कळत नव्हते. मात्र, आता “ट्री वाय-फाय’ या समस्येचे समाधान आहे. हे डिव्हाइस आपल्या परिसरातील प्रदूषणाची पातळी दर्शवते. “डिजिटल डिझाइनिंग’मध्ये तज्ज्ञ असलेले लॅम यांना हे डिव्हाइस बनवण्यासाठी चार महिने लागले.

हे डिव्हाइस आधी मुख्य सर्व्हरला प्रदूषणाची आकडेवारी पाठवते. त्यानंतर सर्व्हरकडून हा डेटा पुन्हा डिव्हाइसकडे परत येतो. जर परिसरातील प्रदूषण नियंत्रणात असले तर तुमचे इंटरनेट सुुरू होईल, नसता एलईडी लाइट सुरू होतील. तुमचा मोबाइल या वाय-फायसोबत कनेक्ट झाला तर
तुम्हाला मोबाइलवर प्रदूषण कमी करण्याच्या टिप्स देखील मिळतील.

प्रदूषणामुळे नुकसान
२०६० मध्ये वायू प्रदूषणामुळे जगभरात १३५ लाख काेटी रुपयांचे नुकसान होण्याचा अायसीडीचा अंदाज आहे. म्हणजेच त्या वेळच्या जगाच्या जीडीपीच्या एक टक्का इतके नुकसान होईल. आजारी पडल्यामुळे घेतलेल्या सुट्या, उपचार आणि शेतातील उत्पादन कमी झाल्यामुळे हे नुकसान होणार असल्याचा आयसीडीचा अंदाज आहे. प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम चीन आणि भारतात होणार असून येथे अाकस्मिक मृत्यू होण्याची जास्त शक्यता आहे.

नेदरलँड्सच्या सरकारची पसंती, इतर देशांनाही कुतूहल
लॅम यांनी या डिव्हाइसचे प्रोटोटाइप अनेक ठिकाणी लावले आहेत. यात चालू स्थितीत प्रदूषण दिसत असल्याने सरकारी अधिकाऱ्यांनाही हे डिव्हाइस आवडले आहे. इतर युरोपीय देशांनीदेखील याबद्दल कुतूहल व्यक्त केले आहे. यात आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यासाठी लॅम यांनी अभियंता आणि पर्यावरण तज्ज्ञांना कामाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी पैशाचीदेखील व्यवस्था केली आहे.

गुगलचा "सुपरफास्ट वाय-फाय’ येतोय
सध्या फायबर ऑप्टिक केबलच्या (ब्रॉडबँड) माध्यमातून इंटरनेटची अल्ट्रा हाय स्पीड मिळते. मात्र, केबल टाकणे खूपच खर्चिक काम आहे. त्यामुळे गुगलने याला पर्याय शोधला आहे. सध्या गुगल सुपरफास्ट वाय- फायवर काम करत आहे. यामध्ये तरंगांच्या माध्यमातून (जसे सध्या ३ जी / ४ जी मध्ये होते) फायबर ऑप्टिकसारखी गती मिळेल. यासाठी खर्च कमी लागत असल्याचे हे स्वस्त असेल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...