आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका ट्विटरवर मिळणार गॅस सिलिंडर, रेल्वे नंतर पेट्रोलियम मंत्रालय सक्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वे पाठोपाठ पेट्रोलियम आणि टेलिकॉम मंत्रालयाने ट्विटर हँडलवर तक्रारी सोडवण्याच्या कामाची सुरुवात केली आहे. मंत्रालयाने यासाठी कंट्रोल रुम तयारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालय देखिल अशाच पद्धतीने तक्रारी सोडवण्याचे काम सुरु केले आहे.

कसे चालते तक्रार निवारणाचे काम
- पेट्रोलियम मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे अधिकारी ट्विटरवर मिळालेल्या तक्रारींचे निवारण करत आहेत.
- अधिकारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या ट्विटर हँडल @dpradhanBJP  वर नजर ठेवून असतात.
- याबद्दल प्रधान यांनी सांगितले, लवकरच प्रत्येक राज्यात ऑइल कंपन्यांसाठी वेगळे ट्विटर हँडल उपलब्ध करुन दिले जाईल.
- देशभरात लोक एलपीजी आणि रॉकेलचा वापर करतात, त्यामुळे आम्हाला थेट त्यांच्याशी संपर्क करता येईल.
- एलपीजी आणि रॉकेल वितरणात कोणाला काही समस्या असेल तर आम्ही तातडीने त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करु.