आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता घरीच तपासा दुधाची भेसळ, भेसळ ओळखण्याची किट उपलब्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आता दुधातील भेसळ काही मिनिटांत शोधली जाऊ शकते. एवढेच नव्हे तर दूध ताजे आहे की शिळे हेही माहीत होईल. केवळ पाच मिली दुधात एक लहान पट्टी टाकल्यानंतरच्या रंग बदलातून भेसळ ओळखता येऊ शकेल. दुधात युरिया, बोरिक अॅसिड, स्टार्च, आदी सात प्रकारचे भेसळीचे घटक ओळखण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(डीआरडीओ) म्हैसूर येथील डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीने (डीएफआरएल) हे किट तयार केले आहे.

किट तयार करणाऱ्या टीमशी संबंधित शास्त्रज्ञ पी. मुरुगन म्हणाले, सध्या केवळ द्रव रसायनावर आधारित प्रणाली उपलब्ध आहे आणि याची तपासणी त्यातील जाणकारच करू शकतो. दुधात अर्ध्या टक्क्याची भेसळ असेल तर स्ट्रीपच्या रंगात बदल दिसेल आणि भेसळ ओळखू येईल. किट तयार करण्यासाठी डीआरडीओला चार वर्षे लागतील. मुंबईतील एक कंपनी पर्ल कॉर्पोरेशनला याच्या व्यावसायिक वापराला परवागणी देण्यात आली आहे. कंपनीने बाजारात एक हजार रुपये किमतीत किट उपलब्ध आहे.

भेसळीमुळे बदलतात रंग
युरिया मिसळला असल्यास पिवळा,सोप-डिटर्जंट असल्यास निळा, पिवळा आणि हिरवा बोरिक अॅसिड असल्यास गडद नारंगी, हायड्रोजन पॅराऑक्साइड असल्यास पांढरा, न्यूट्रीलायजर (सोडियम हायड्राॅक्साइड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट) मिसळले असल्यास गुलाबी, स्टार्च असल्यास निळा आणि बॅक्टेरिया, फंगस असल्यास गुलाबी व जांभळा रंग तयार होतो.

५ मिनिटांत सात प्रकारची भेसळ कळणार
- किटमध्ये आठ बाटल्या व आठ स्ट्रिप आहेत.
- दूध गायीचे की म्हशीचे हे कळू शकेल
- मापन मानकापेक्षा कमी येत असल्याने त्यात पाणी मिसळण्यात आले आहे
- मापन मानकापेक्षा जास्त येत असल्यास दुधातील मलाई काढते.