आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनएसडीमध्ये अवतरणार जागतिक रंगभूमी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीन, बांगलादेश, इंडोनेशिया, इराण, इराक, जपान, द.कोिरया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलंड या देशांतील १४ थिएटर स्कूलच्या रंगकर्मींचा अभिनय पाहण्याची पर्वणी लवकरच रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे दिल्लीतल्या एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये १९ ते २५ आॅक्टोबरदरम्यान आयोजित संमेलनाचे.
संमेलनासाठी जागतिक रंगभूमीच अवतरणार असल्याची माहिती एनएसडीचे संचालक प्रा. वामन केंद्रेंनी दिली. केंद्रे म्हणाले, एनएसडीत नवव्या आशिया पॅसिफिक मीटचे आयोजन करण्यात आले असून एनएसडीच्या आजवरच्या कारकीर्दीतला हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या निमित्ताने आपल्या नाट्य कलाकृती, संस्कृती व कला क्षेत्रातल्या अनुभवांचे परस्परांना आदानप्रदान करतील, ‘द स्ट्रेंथ आॅफ आशिया इन कंटेंपररी थिएटर परफॉर्मन्स कल्चर’ ही नवव्या आशिया पॅसिफिक मीटची थीम आहे. त्याला अनुसरून १0 थिएटर स्कूलशी संलग्न २0 देशांतले नाट्यकला शिक्षक, विद्यार्थी, समीक्षक व रंगभूमीशी संबंधित कलाकार या संमेलनात सहभागी होत आहेत. या निमित्ताने भारतीय रंगभूमीचे कलाकार आपल्या थिएटर कलेचा व रंगभूमीच्या परंपरेचा अाविष्कार जगासमोर सादर करणार आहेत. जागतिक रंगभूमीच्या नाट्य चळवळीतल्या नव्या प्रवाहांचे, नाट्यसंहितेतल्या नव्या संकल्पनांचे अवलोकन प्रतिनिधी रंगकर्मीना करता येईल व त्याचे आदानप्रदानही होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...