आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय शेअर बाजारात माेठी तांत्रिक गडबड; 3 तास ठप्प होती ट्रेडिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनएसईमध्ये सोमवारी सकाळपासून दोनदा तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात आले. - Divya Marathi
एनएसईमध्ये सोमवारी सकाळपासून दोनदा तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात आले.
नवी दिल्ली / मुंबई - डॉमेस्टिक स्टॉकमध्ये सुरुवातीलाच आलेल्या तेजीमुळे सेंसेक्सने विक्रमी 31,602 अंकांचा आकडा गाठला आहे. सेंसेक्सची ही ऑल टाईम हाय आकडेवारी आहे. सध्या सेंसेक्स 206 अंकांच्या तेजीने 31,597 वर आहे. तर दुसरीकडे एनएसईमध्ये आकडेवारी अपडेट करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सोमवारी सकाळी 11.15 वाजता तांत्रिक समाधान शोधून ट्रेडिंग पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, एनएसईचा प्रयत्न दुसऱ्यांदा अपयशी ठरला आहे. यापूर्वीही सकाळी पावणे 11 च्या सुमारास तांत्रिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अखेर बिघाडाच्या तीन तासांनंतर दुरुस्ती करण्यात आली आणि ट्रेडिंग पुन्हा सुरू झाली. या प्रकरणी अर्थमंत्रालयाने सेबी आणि एनएसईकडून अहवाल मागवला आहे.

सकाळपासून एनएसई ट्रेडिंग बंद...
- कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडचे व्ही.पी. अंबरीश बालिगा यांनी सांगितल्याप्रमाणे, काही तांत्रिक अडचणींमुळे एनएसईवर आकडेवारी अपडेट करता आली नाही. असे प्रकार पहिल्यांदा नाही, तर यापूर्वी सुद्धा घडले आहेत. 
- एनएसईवर सकाळी 10.30 वाजता प्री-ओपनिंगपासून आतापर्यंत सौदा होऊ शकलेला नाही. पावणे अकराच्या सुमारास अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केले. त्यानंतर साडे अकरा वाजता सुद्धा प्रयत्न झाला. तो सुद्धा यशस्वी होऊ शकलेला नाही.
 
 
बीएसईचे ट्रेडिंग व्हॉल्यूम 2.5 पट
एनएसईवर आलेल्या तांत्रिक बिघाडाचा फायदा बीएसईला झालेला दिसून आला आहे. या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर एनएसईचा कल बीएसईकडे झुकला. परिणामी, बीएसईमध्ये स्टॉक ट्रेडिंग रेट अडीच पटीने वाढला आहे.
बातम्या आणखी आहेत...