आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात अनेकांचे बळी गेले. अनेक जणांना अपंगत्त्व आले. काळे कपडे घातलेले एनएसजीचे कमांडो हेलिकॉप्टरमधून उतरत असतानाचे दृष्य आपल्याला आठवत असेल. याच कमांडोंच्या पथकपैकी एक जण आम आदमी पार्टीचा आमदार झाला आहे. एनएसजी कमांडो सुरेंदरसिंग यांनी या हल्ल्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, त्याच हल्ल्यात अपंगत्त्व आल्यामुळे त्यांना वैद्यकीय कारणांमुळे सेवानिवृत्त व्हावे लागले होते.
सुरेंदरसिंग यांनी निवडणुकीत कमाल केली आहे. 'आप'च्या तिकीटावर ते दिल्ली कॅण्टोन्मेंट लढले. तीन वेळा आमदार असलेले भाजपचे करणसिंग तलवार यांचा त्यांनी पराभव केला. सुरेंदर सिंग यांना तब्बल 26 हजार 124 मते मिळाली. निवडणूक जिंकल्यानंतर ते म्हणाले की, ‘जब फौज मे था तब भी जान हाजीर थी, आज भी हाजीर है’. त्यांनी लोकांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि जनतेचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.