आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NSG Left Behind A Stun Grenade Shell Inside The Aircraft Used For Modi

NSG कडून मोदींच्या विमानात राहिले होते ग्रेनेड, एयर इंडियाचे 4 कर्मचारी सस्‍पेंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - मोदींच्या विमानात सापडलेले स्‍टन ग्रेनेड.
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौ-यादरम्यान पर्यायी वापरासाठी तयार ठेवण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानात निष्‍क्रिय ग्रेनेड सापडल्याच्या प्रकरणी एअर इंडियाने चार कर्मचा-यांना निलंबित केले आहे.
हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या अमेरिकेला पोहोचल्यानंतर हे विमान नॅशनल सेक्‍युरिटी गार्ड्स (एनएसजी) द्वारे म़क ड्रीलसाठी वापरले होते. यावेळी त्यांनी हे ग्रेनेड विमानात सोडले असल्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या या दाव्यानंतर विमानात प्‍लास्टिक पेपर मिळाल्याचा एअर इंडियाचा दाव साफ खोटा ठरला आहे. त्यामुळे एअर इंडियाने चार कर्मचा-यांना निलंबित केले आहे. त्यापैकी दोघे दिल्‍ली तर दोघे जबकि हैदराबादचे आहेत.

स्‍टन ग्रेनेड मिळाले
अशोक गजपती यांनी सांगितले की, विमानाच्या बिजनेस क्लासमध्ये स्टन ग्रेनेड सापडले. मात्र त्यात स्फोटके नव्हती. तसेच त्यामुळे कोणाच्याही जिविताला धोका नव्हता, असेही मंत्र्यांनी सांगितले. हातगोळ्यावर बीएसएफचे चिन्ह असल्याचेही ते म्हणाले आहेत.

चौकशीचे आदेश
या प्रकरणाची दखल मंत्र्यांनी घेतल्यानंतर एअर इंडियाने चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. एअरलाइन्स आणि हवाई वाहतूक सुरक्षा ब्युरोची एक संयुक्त टीम तपास आणि जबाबदारी ठरवण्यासाठी तत्काळ मुंबईला पाठवले जाणार आहे.

काय आहे प्रकरण?
गुरुवारी रात्री मोदी भारतात पोहोचल्यानंतर हे विमान व्यावसायिक वापरासाठी दिल्‍ली-मुंबई-हैदराबाद-जेद्दाहच्या रूटवर पाठवले जाईल. लँडिंगच्या पूर्वी बिझनेस क्लासचे सीट ला लागून एक प्लास्टीकचा बॉक्स पुढे आला. केबिन क्रू ने तो पाहिला आणि पायलटला माहिती दिली. पायलटने एटीसीला कलवले आणि पायलटने विमान दूर नेले. ग्रेनेडमध्ये स्फोटके नसल्याचे नंतर तपासात समोर आले.