आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौदलात गुपचुप दाखल झाली भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी \'INS अरिहंत\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई- भारतीय नौदलाच्या ताफ्यात देशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी 'INS अरिहंत'ला गुपचूप दाखल झाली आहे. आण्विक पाणबुडीचे पाच महिन्यांपूर्वी जलावतरण करण्यात आले होते. या पाणबुडीने शत्रूवर हल्ला करण्याबरोबरच खोल समुद्रातील सर्व चाचण्या यशस्वी केल्या होत्या.

रशियाच्या नौदलाच्या डायव्हिंग पथकानेही या चाचण्यांसाठी मदत केली. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ताफ्याच्या पाहणी वेळी सुरक्षेच्या कारणास्तव ही पाणबुडी प्रदर्शनात ठेवण्यात आली नव्हती. दरम्यान, एका टीव्ही चॅनलच्या रिपोर्टनुसार, पाणबुडीला गेल्या ऑगस्टमध्ये नौदलाच्या ताफ्यात गुुपचूप सहभागी करुन घेण्यात आले होते. INS अरिहंत असलेला भारत हा जगातील सहावा देश ठरला आहे. भारताने स्वत: ही आण्विक पाणबुडी विकसित केली आहे. यापूर्वी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीनजवळ आण्विक पाणबुडी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाकडे सोपवली INS अरिहंत
- पीटीआय न्यूज एजन्सीनुसार, नौदलाने टीव्ही चॅनल न्यूज 'एक्स'चे वृत्ताबाबत मौन बाळगले आहे.
- न्यूज एक्सच्या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ऑगस्टमध्ये INS अरिहंत पाणबुडीला गुपचून नौदलाकडे सोपवले होते. त्यानंतर नौदलाने त्यावर कामही सुरु केले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, INS अरिहंतचे प्रमुख वैशिष्टये...
बातम्या आणखी आहेत...