नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची 21 जानेवारी ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांनी
आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषीत केला आहे तर 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद
केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी 'प्रेरणादायी' महिला नुपूर शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने पत्रकार परिषदेत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. दुसरीकडे, नुपूर शर्मा यांना नवी दिली विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवी दिल्लीतून 'आप'चे सर्वेसर्वा
अरविंद केजरीवाल रिंगणात आहेत. 31 वर्षीय नुपूर शर्मा हा दिल्ली भाजपचा युवा चेहरा आहे.
नुपूर शर्मा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्ष आहे. नुपूर शर्मा यांनी 2008मध्ये 'एनएसयूआय'च्या सोनिया सापरा यांचा 1700 मतांनी पराभव केला होता. नूपुर यांना एकूण 10345 मते मिळाले होते.नुपूर यांनी मागील सहा वर्षांपासून पराभवाचा सामना करणार्या एबीव्हीपीला विजय मिळवून दिला होता. सध्या नुपूर यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे 'नॅशनल मीडिया'चा प्रभारी आहेत.
10 प्रेरणादायी महिलांमध्ये सहभाग...
नुपूर शर्मा यांनी दिल्लीत शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. नंतर 'लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स'मधून एलएलएम पूर्ण केले. 2009 साली 'हिन्दुस्तान टाइम्स'ने जाहीर केलेल्या 10 प्रेरणादायी महिलांमध्ये नुपूरचा समावेश करण्यात आला होता.
नवी दिल्लीतील भाजपच्या उमेदवार नुपूर शर्मा यांचे निवडक फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....