आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nurses Return Home, Joy Erupts Among Family Members

खुशखबर.... इराकहून घरी पोहोचली खुशी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकहून 46 परिचारिकांसह 183 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान शनिवारी भारतात पोहोचले आणि पंधरवड्यापासून निर्माण झालेला तणाव आणि अनिश्चितता संपुष्टात आली. या परिचारिका तीन दिवस आयएसआयएस दहशतवाद्यांच्या ताब्यात होत्या. दहशतवाद्यांनी त्यांना सन्मानाची वागणूक दिल्याचे त्यांनी सांगितले. कोची विमानतळावर सकाळपासूनच त्यांचे आप्तस्वकीय, सरकार आणि सर्वसामान्य लोक त्यांची वाट पाहत होते.

मध्यरात्रीचे नाट्य
शुक्रवार-शनिवारदरम्यानच्या रात्री परिचारिकांना आणण्यासाठी गेलेल्या एअर इंडियाच्या विमानाला इराकच्या हवाई हद्दीत परवानगी नाकारण्यात आली. परिचारिकांच्या कुटुंबीयांच्या आशा मावळू लागल्या होत्या. तिकडे परराष्ट्र मंत्रालय आणि पीएमओत हालचाली सुरू झाल्या. इराक सरकार आणि कुर्दिस्तान प्रशासनाशी संपर्क साधला. तोपर्यंत विमान कुवेतच्या दिशेने वळले होते. काही मिनिटांत स्थिती स्पष्ट झाली आणि विमान पुन्हा इर्बिलला वळवण्यात आले.

3 जुलैला होती घोर निराशा
सरकारने बराच वेळ वाया घालवला. आता सरकारने आमच्यासाठी शवपेट्याच पाठवाव्यात.
- सोना जोसेफ, इराकमध्ये अडकलेल्या परिचारिकेने फोनवर कुटुंबीयांना सांगितले होते.