आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nyt Mangalyan Cartoon Makes Fun Of Indian Space Agency

नरेंद्र मोदी भारतात परत येताच अमेरिकेने उडवली \'मंगळयान\' मोहिमेची थट्टा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: NYTमध्ये प्रसिद्ध झालेले मंगळयानाचे कार्टून)

नवी दिल्ली- अमेरिकन वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाइम्स'ने भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मंगळयान' मोहिमेची थट्टा उडवली आहे. भारताच्या मंगळयान मोहिमेवर 'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये एक वादग्रस्त व्यंगचित्र (कार्टून) प्रसिद्ध झाले आहे. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

फेटा बांधलेला एक भारतीय व्यक्ती त्याच्या गाईसोबत 'एलीट स्पेस क्लब'चा दरवाजा ठोठावताना दाखवण्यात आले आहे. क्लबचा एक सदस्य वृत्तपत्र वाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे 'भारताचे मंगळयान मोहिम' असे शिर्षकही दिले आहे.
स्पेस क्लबमध्ये बसलेले सदस्य मात्र, दरवाजा ठोठावणार्‍या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. भारतात ब्रिटिश शासन होते, याची या व्यंगचित्रातून आठवण करून दिली आहे. तत्कालिन काळात भेदभाव मानला जात होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच पाच दिवसीय अमेरिका दौरा केला. मोदींच्या दोर्‍यांच्या अंतिम दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताच्या मंगळयान मोहिमेची प्रशंसा केली होत‍ी. मात्र मोदी भारतात परत येताच अमेरिकेने भारतीय मंगळयान मोहिमेची थट्टा उडवली आहे.