आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama Coming India Its Will Be Benefit Of BJP In Delhi Election

बराक ओबामांचे दिल्लीत येणे भाजपच्या पथ्यावर पडणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ओबामा दिल्लीत येण्याआधीच प्रचारतोफा थंडावल्याचे चित्र आहे. प्रसारमाध्यमांकडे ‘ओबामा एके ओबामा’ हाच विषय आहे. त्यामुळे किरण बेदी, केजरीवाल व अजय माकन हे तूर्तास मागे पडले आहेत. उद्यापर्यंत असेच राहणार. ओबामा कुठे जाणार, त्यांची सुरक्षा व त्यांना कोण कोण भेटणार या विषयाचेच चर्वण सुरू आहे.

ओबामांच्या सुरक्षेच्या कहाण्या ऐकून दिल्लीकरांना आज-उद्या घरातच थांबलेले बरे, असे वाटायला लागले आहे. मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळीच ओबामांनी आमंत्रण स्वीकारले होते. प्रजासत्ताकदिनी ओबामा दिल्लीत आले आहेत त्यामुळे त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. ओबामांना महात्मा गांधी हे आदर्श आहेत. ओबामांच्या हृदयात गांधीजींना स्थान असल्याचे मोदींनी आधीच हेरले होते. त्यामुळेच त्यांना अमेरिकेत गांधीजींचा वारंवार जप करावा लागला होता. मोदींचे मार्केटिंग कौशल्य उत्तम आहे. ओबामांकडून मोदींना तेव्हा मिळालेला व आता जो ‘भाव’ मिळत आहे त्याचे संपूर्ण श्रेय महात्मा गांधींनाच जाणार आहे. दिल्ली विधानसभेत मोदी लाटेत केजरीवालांचे अडथळे येत असल्याचे त्यांना जाणवताच त्यांनी किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा केला. त्यामुळे दिल्लीत भाजप सत्तेत येऊ शकतो, अशी भाकिते व्हायला लागली. परंतु ओबामांच्या दिल्लीत येण्यामुळे भाजपचे सरकार येण्याच्या शक्यतेचे परिवर्तन विश्वासात झाले आहे. काँग्रेसने नव्या उमेदीने अजय माकन यांच्या नेतृत्वात या निवडणुकीत पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी तो २०१३ निवडणुकीपेक्षा चांगला निकाल देईल असे वाटत नाही.

मुसलमानांचा मोठा समुदाय कॉँग्रेसकडून तुटून केजरीवालांच्या पाठीशी आहे. त्यामागे हिंदुत्वाच्या विरोधाची भावना या समुदायाच्या मनात रुजलेल्या आहेत. कधीकाळी याच समुदायाने काँग्रेसला सातत्याने पंधरा वर्षे सत्तेत ठेवले. परंतु राहुल गांधी यांचे नवखेपण व जाती-धर्मावर आधारित मतदारांकडून काँग्रेसने मदतीची अपेक्षा करणे हास्यास्पद आहे. दिल्ली निवडणुकीत याही वेळी असेच चित्र आहे. पुन्हा संधी द्या, मी त्याचे सोने करतो, असे सांगणारे केजरीवाल यांना बेदींनी चांगलाच घाम फोडला आहे. केजरीवाल बेदींच्या तुलनेत कमी नाहीत; स्वच्छ प्रतिमा दोघांचीही आहे. मात्र, केंद्रात मोदी असल्याचा फायदा त्यांना मिळणार आहे.