आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांचा भारत दौरा: मनमोहन ते मोदी, मागील दौ-यापेक्षा कसा आहे वेगळा?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ओबामा रविवारी सकाळी 10 वाजता दिल्लीत पोहचले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. असे नाही की ओबामा प्रथमच भारतात आले आहेत. यापूर्वी मनमोहन सरकार असतानाही ओबामांनी भारत दौरा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत भारतात अनेक बाबतीत बदल झाला आहे. मोदी पंतप्रधान बनले आहेत. 2010 मध्ये प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती होत्या तर आता प्रणब मुखर्जी आहेत.
मागील दौ-यावेळी ओबामा दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी गेले होते. या दौ-यावेळी ते फक्त दिल्लीत थांबणार आहेत. आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी ओबामा जाणार होते मात्र तेही काही कारणास्तव रद्द करण्यात आले आहे. मागील वेळी ओबामा दिल्लीतील हुमायूंचा मकबरा पाहण्यासाठी दिल्लीत गेले होते.

पुढे पाहा, ओबामांच्या भारत दौ-यातील फोटो...